Ad will apear here
Next
निसर्गमित्र पुरस्कार अमृता राणे यांना जाहीर
गुरुवारी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा
पक्षी अभ्यासक अमृता राणे

पुणे : निसर्ग, पर्यावरण संवर्धन, ट्रेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अॅड-व्हेंचर फाउंडेशन संस्थेतर्फे देण्यात येणारा निसर्गमित्र पुरस्कार यंदा पक्षी अभ्यासक अमृता राणे यांना जाहीर झाला आहे. 

‘अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा हा १३ वा श्री. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार अमृता राणे यांना येत्या गुरुवारी पुण्यात माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार उपस्थित राहणार आहेत. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली. 


‘अमृता राणे यांनी अरुणाचल प्रदेशमधील पाक्के राष्ट्रीय उद्यानात धनेश (हॉर्नबिल) पक्ष्यांचे संवर्धन आणि त्यांच्या घरट्यांचे रक्षण करण्याचे काम केले. तब्बल चार वर्षे ती एकटी या अभयारण्यात राहिली. निशी या आदिम जमातीतील लोकांच्या मदतीने तिने निसर्गपर्यटन केंद्र सुरू केले. या पक्ष्यांच्या अवैध व्यापारावरही बंधने आणली. अमृता राणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पती शास्त्रात बी. एस्सी पदवी प्राप्त केली असून, इंग्लंडमधील ईस्ट अजेलीया विद्यापीठातून परीसंस्थाशास्त्र आणि संवर्धन या विषयात एम. एस्सी पदवी घेतली आहे. मॉरिशसमधील ‘वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ संस्थेत सहायक संशोधक म्हणून काम केले. ऋतूजैविकी क्षेत्रात विशेष रस असल्याने त्या पक्षी संवर्धनाच्या कामाकडे ओढल्या गेल्या. त्यांच्या या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे’, असेही देशपांडे यांनी सांगितले. 


पुरस्कार सोहळ्या दरम्यान, अमृता राणे यांच्याशी विवेक देशपांडे आणि अनुज खरे संवाद साधणार असून, पाक्के अभयारण्यातील धनेश पक्ष्यांवर आधारीत स्लाईड शो आणि व्हिडिओ सादर करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाविषयी 
निसर्गमित्र पुरस्कार वितरण 
स्थळ : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ.
दिवस व वेळ : गुरुवार, दि. १० जानेवारी, सायंकाळी सहा वाजता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZWZBW
 सार्थ अभिमान कष्ट करणारा कुणी असो चिद़ चिकाटी निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा मानवाला माझा त्रिवार वंदन
Similar Posts
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची पुणे : ‘पर्यावरण संवर्धन करताना काही विशिष्ट घटकांकडेच लक्ष दिलं जातं, आपण वाघाच्या संवर्धनाबाबत गंभीर असतो, पण त्याच वेळेला माळढोक, रानम्हशी यासह जंगल आणि सागरामधील अनेक वनस्पती, जीव नष्ट होत आहेत याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. निसर्गातील सर्व घटकांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असे
‘पालक-शिक्षक विद्यार्थ्यांचे आयकॉन बनावेत’ पुणे : ‘मुलांना समान संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मला आरक्षण नको, आम्ही आमच्या गुणवत्तेवर इतरांशी स्पर्धा करून जिंकू, असे प्रत्येक विद्यार्थ्यांने म्हणावे. मुलांना चारित्रवान व प्रामाणिक बनविण्यासाठी शिक्षकाने स्वतः प्रामाणिक असायला हवे. पालक व शिक्षक मुलांचे आयकॉन बनावेत. जीवनात यशस्वी
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language